पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र काही काळ थांबल्यानंतर आज पुन्हा तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. शहराच्या पिंपळे गुरव भागात सहा ते सात समजकंटकांनी हातात कोयते घेऊन आठ गाड्यांची तोडफोड केली. यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी शेखर चांदणे यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. पिंपळे गुरव भागात अज्ञात समाज कंटकांनी ओंकार कॉलनी मधील रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी वाहनांना लक्ष करत आठ गाड्यांची तोडफोड केली आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला आहे.या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहे.
सहा ते सात जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊ धुडगूस घालत गाड्यांची तोड तोडफोड केली आहे.फिर्यादी शेखर चांदणे यांच्या मालकीच्या तीन गाड्या फोडल्या असून ते ओंकार कॉलनी मध्ये गाडी घेऊन येत असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात टोळक्याने कोयता हल्ला चढवला यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत.या घटनेत पुतण्याला डोळ्याला काच लागल्याने किरकोळ जखम झाली आहे.सुदैवाने घटनेत तिघे जण बचावले आहेत.अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
First Published on: December 25, 2018 6:09 PM
Exit mobile version