राज ठाकरेंच्या भाषणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या मेळाव्यात अनेक विषयांवर मुद्दे मांडले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही खडेबोल सुनावले. मात्र, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंचं हे भाषण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतं. त्यांनी सामान्य लोकांचे विषय वगळले, असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

First Published on: March 23, 2023 3:23 PM
Exit mobile version