ब्रुक फार्मा कंपनी व भाजपा नेत्यांचे रेमडेसीवीरच्या काळ्याबाजारात संगनमत

ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा. भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते हे उघड आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. रेमडेसीवीरसारखे नोंदणीकृत औषध असे विकले जाणे व लोकांकडून अनधिकृतपणे पैसे घेणे हे भयानक आहे, असेही ते म्हणाले.

First Published on: April 20, 2021 9:43 PM
Exit mobile version