…आणि वाझे पुन्हा सेवेत आले

सचिन वझेंना २००४ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतली होती. पण, चौकशीमुळे त्यांची व्हीआरएस मंजूर झाली नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एपीआय सचिन वाझेंना पुन्हा एकदा पोलीस दलात घेण्यात आले. त्यांना पुन्हा सेवेत का घेण्यात आले, याबाबत अद्याप उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचे उद्धव ठाकरेंने उत्तर द्यावे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा केली आहे.

First Published on: March 22, 2021 2:33 PM
Exit mobile version