सेनाभवनावर येण्याचा विचार पण करु नका – सदा सरवणकर

राम मंदिर जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेने सामनामधून केली. यावरुन भाजपच्या युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. मात्र, सेना भवनाच्या आधीच हा मोर्चा शिवसैनिकांनी रोखला. आमदार सदा सरवणकर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी सेनाभवनावर येण्याचा विचार पण करु नका असा थेट इशारा दिला. या राड्यानंतर शिवसैनिकांनी मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांना सल्ला दिला.

First Published on: June 18, 2021 9:04 PM
Exit mobile version