भारतीय लष्कराकडून कोरोनाशी लढणाऱ्यांना मानवंदना

देशभरातील कोरोना व्हायरसविरोधात लढाणाऱ्या योध्यांना सलाम करण्यासाठी आज भारतीय लष्कराकडून विशेष मानवंदना देण्यात आली. जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या हॉस्पिटलवर वायुदलाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. डॉक्टरर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अनोख्या मानवंदनेचा स्वीकार करत भारतीय सैन्याचे आभार मानले. मुंबईतही केईएम, जेजे, कस्तुरबा आणि आयएनएचएस आश्विनी या हॉस्पिटल्सवर नेव्हीच्या एमआय १७ आणि चेतक हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मरीन ड्राईव्हवर वायूदल आपल्या सुखोई ३० या लढाऊ विमानांचे फ्लायपास मार्चिंग पाहायला मिळाले.
First Published on: May 3, 2020 2:39 PM
Exit mobile version