संजय राऊतांनी विरोधकांवर साधला निशाणा

राजकारणात आजकाल सगळेच बडे नेते महागडं अत्तर स्वत:च्या घरी ठेवतात. परंतु दुसऱ्याच्या घरात सापडलं तर ही मोठी गोष्ट असते. लखनऊ, कन्नौज, कानपूर १८० कोटीचं पेपर परफ्युम मिळालं आहे. यावर आता राजकीय खेळीला सुरूवात झाली आहे. गोव्यात काय चाललंय?, यूपी आणि पंजाबमध्ये काय होईल. याच महागड्या अत्तराचा वापर करून हे लोकं निवडणूक लढणार आहेत. तसेच जिंकणारही आहेत.अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती बद्दल माहिती दिली आहे.

First Published on: December 29, 2021 12:22 PM
Exit mobile version