संस्कार, संस्कृती जपून ठेवली

संजय राऊतांनी 12 खासदारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी शरद पवारांना बसायला खुर्ची दिली. पवार साहेबांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला मनुष्य हा पवारांना खुर्ची द्यायचा विचार करेल. आपल्यापेक्षा कोणताही मोठा माणुस असेल तेव्हा त्यांना खुर्ची देणे हा आपला संस्कार आणि संस्कृती आहे. तो कोण आहे, काय आहे आपण पाहत नाही. आपल्याला दिसणाऱ्या वयोवृद्ध माणसाला काय अडचणी असतील हे पाहणे हे संजय राऊतांमधील संस्कार आहेत. त्याबाबत एवढी चर्चा करायची हे काय सुरू आहे महाराष्ट्रात असाही सवाल त्यांनी केला. पवारांच्या शारिरीक अस्वस्थतेबद्दल माहिती असणारे संजय राऊत आहेत. संजय राऊतांनी खुर्ची दिली त्यासाठी मी राऊतांना नमन करतो. कारण त्यांनी संस्कार आणि संस्कृती धरून ठेवली.

First Published on: December 9, 2021 5:56 PM
Exit mobile version