किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांकडून अपशब्दांचा वापर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भेट घेणार आहेत. आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची परवानगी घेतली का?, असा खोचक सवाल भाजप नेते किरीट सोमय्यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपशब्दांचा वापर केला. ‘हे लोक चु* आहेत. देशाच्या राजकारणात २०२४ च्या नंतर असा चु* लोकांना स्थान उरणार नाही,’ असx संजय राऊत म्हणाले.

First Published on: February 20, 2022 1:38 PM
Exit mobile version