संजय राऊतांच्या आरोपाने ठाण्यातील गुंडशाही पुन्हा चर्चेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. मला जीवे मारण्याची सुपारी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला दिली, असा आरोप राऊतांनी केला आहे. राऊतांच्या आरोपांमुळे ठाण्यातील गुंडशाही पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान, ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे आणि राजा ठाकूर यांच्या कनेक्शनबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

First Published on: February 21, 2023 7:34 PM
Exit mobile version