फडणवीसांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले ‘देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात करु दे. तेच करणार टीका. कारण त्यांना असं वाटतं की, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली’. तसेच मंगळवारी जळगावमधील मुक्ताईनगर येथे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर बोलताना ‘विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गाठीभेटी होत राहिल्या पाहिजेत,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

First Published on: June 2, 2021 3:01 PM
Exit mobile version