मी तोंड उघडलं तर केंद्राला हादरा बसेल

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. मी तोंड उघडलं तर केंद्राला हादरा बसेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला. वेगवेगळ्या मार्गाने धमकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मी यांचा बाप आहे, असं स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला.

First Published on: December 28, 2020 3:26 PM
Exit mobile version