संजय गायकवाडांचे विधान, कर्मचाऱ्यांचा रोष

जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने देखील समिती नेमली असून तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर केला जाईल. मात्र शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई असल्याचं त्यांनी म्हटलंय.

First Published on: March 19, 2023 4:59 PM
Exit mobile version