संजय राऊतांचा गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. या प्रकरणाची दखल घेत अनेकांचे जवाब नोंदवण्यात आले. मात्र या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणण्याचं काम पोलीस करत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. तसेच मी कार्यालयात नसताना दैनिक सामनातील लोकांना देखील धमकावलं असल्याची माहिती राऊतांनी दिली.

First Published on: February 23, 2023 12:43 PM
Exit mobile version