देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर राऊतांचे प्रत्युत्तर

आमचे काही मित्र आहेत. त्यांना मागच्या काळात कोणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर भारतीयांच्या धुळवड कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? भांग उतरली की सत्ता जाईल, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

First Published on: March 9, 2023 10:39 AM
Exit mobile version