जेएनयूला पहिल्यांदाच महिला कुलगुरू, शांतीश्री यांची कुलगुरू पदी वर्णी

देशाच्या राजधानी दिल्लीतील जेएनयू हे विद्यापीठ नेहमीचं चर्चेच्या केंद्र स्थानी असतं. दरम्यान आता पुन्हा एकदा चर्चा होतेय ती म्हणजे जेएनयूच्या कुलगुरू पदाची. पुण्याच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांच्याकडे नुकतचं जेएनयूच्या कुलगरु पद देण्यात आलं आहे. दरम्यान जेएनयूच्या 52 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हे पद एका महिलेकडे जात आहे.

First Published on: February 8, 2022 9:43 PM
Exit mobile version