संतुर मॉमला काम करण्याचा सल्ला देणारी ‘सांची’

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेली सांची वानखेडे या नाशिकच्या मुलीला मोठं होऊन अभिनेत्री बनण्याची इच्छा आहे. सांचीचा काही दिवसांपूर्वी संतुर मॉमला सल्ला देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. खूप कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळाल्यामुळे सांचीच्या आई-वडिलांना आनंद झाला आहे.

First Published on: December 4, 2019 3:38 PM
Exit mobile version