‘येतोय तो खातोय’ बद्दल सांगत आहे लेखक-दिग्दर्शक संतोष पवार

लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषिकेश जोशी यांचे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे. त्या नाटकाचे नाव आहे ‘येतोय तो खातोय’. लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये असलेले हे विनोदी नाटक राजकीय पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर यांनी लिहिलेले असून ऋषिकेश जोशी यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. या नाटकातील एका भूमिकेत लेखक-दिग्दर्शक संतोष पवार देखील आपल्याला दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये संतोष पवार स्वतःचे नाटकाबद्दलचे मत सांगत आहेत.

First Published on: February 9, 2023 9:51 PM
Exit mobile version