नेत्यांची हुजरे करणारे म्हात्रे मंदबुद्धीचे, आमदाराची टीका

कल्याण-डोंबिवली महापालिकेन एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीला सुरवात केली. प्रथम सहामाही रुपये ३०० आणि द्वितीय सहामाही रुपये ३०० असे एकूण ६०० रुपये आता मोजावे लागणार आहेत. मात्र, भाजप सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या जीआर नुसार कल्याण डोंबिवली महापालिका घनकचरा व्यवस्थापन कर वसूल करीत आहे. मात्र, आत्ता भाजपच शिवसेनेच्या नावाने टिकास्त्र सोडून उलटय़ा बोंबा मारत असल्याची टिका शिवसेना नगरसेवक दिपेश मात्रे यांनी केली आहे. तर त्याला प्रतिउत्तर देताना भाजपची मानसिकता ही कर लागू करण्याची नव्हती. आमच्या सरकारच्या काळात हा कर लागू झाला ही बाब कोणी सांगितली तर मीच सांगितली. मात्र, महापालिकेच्या महासभेत हा विषय मंजूरीसाठी आला तेव्हा त्याला भाजप सदस्यांनी शंभर टक्के विरोध केला. हा विषय स्थगित ठेवण्याची सूचना केली. त्या महासभेत म्हात्रे उपस्थित होते की, नाही. त्यांची मानसिकता कशामुळे फिरली. त्यावेळी त्यांच्यावर कोणता दबाव होता का अशी विविध प्रश्नांची सरबत्ती करीत शिवसेना नेत्यांची हुजरेगिरी करणाऱ्या म्हात्रे हे मंदबुद्धीचे आहे अशी टिका चव्हाण यांनी केली आहे.

First Published on: May 29, 2021 1:45 PM
Exit mobile version