शेर शिवराजमधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या 22 एप्रिल रोजी शिवकालीन कथेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘शेर शिवराज’ असून, या चित्रपटामध्ये शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा अध्याय दाखवलेला आहे. याआधी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत आणि आता या सिनेमाचं पहिलं गाणंसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. येळकोट देवाचा असं या गाण्याचं नाव आहे.

First Published on: April 5, 2022 9:13 AM
Exit mobile version