‘तान्हाजी’ चित्रपटामुळं यंदा शिवजयंती जोरात

अजय देवगण अभिनित ‘तान्हाजी’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. शिवकालीन इतिहासातील तान्हाजी मालुसरे हा एक महत्त्वाचा भाग आहे. या इतिहासाची झलक चित्रपटातून सध्याच्या तरुणाईला पाहायला मिळाली. त्यानंतर आलेल्या शिवजयंतीला ही तरुणाई नाशिकमध्ये ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करताना दिसली. चित्रपट हे करमणुकीसाठी असले तरी त्यातून प्रबोधन घडविण्याची मोठी ताकद असते. तान्हाजीच्या निमित्ताने नाशिकची तरुणाई ज्या प्रकारे जल्लोषात शिवजयंती साजरी करत आहे. त्यातून पुन्हा हे अधोरेखित होत आहे.

First Published on: February 19, 2020 5:02 PM
Exit mobile version