शिवसेनेला बाजू मांडण्यासाठी संधी देण्यासाठी कॅव्हेट दाखल

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेचे सर्व खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगत आहेत. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेला बाजू मांडण्यासाठी संधी मिळावी यासाठी कॅव्हेट दाखल केली आहे. सुभाष देसाई यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल करण्यात आली असल्याचे अनिल देसाई म्हणाले आहेत. शिवसेनेतील खासदारसुद्धा एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु सर्व खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे अनिल देसाई म्हणाले.

First Published on: July 11, 2022 5:51 PM
Exit mobile version