ठाकरेंना टक्कर:शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिंदेंना प्रतिज्ञापत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातून मोठा पाठिंबा शिवसैनिकांनी दिला आहे. यामध्ये आता शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र पाठवले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात प्रतिज्ञापत्र भरुन देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त राज्यातील शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र मागवले होते. याला टक्कर देत ठाण्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना प्रतिज्ञापत्र देत पाठिंबा दिला आहे

First Published on: July 29, 2022 6:54 PM
Exit mobile version