केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा धक्कादायक खुलासा

दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असं मत मांडल आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला तुरुंगात आपण टाकत नाही त्याप्रमाणेच ड्रग्स घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे, अशा पद्धतीने विधान करीत ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा देखील खुलासा या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

First Published on: November 6, 2021 12:03 PM
Exit mobile version