भुलेश्वर मंदिरातील श्रावणी सोमवार पुजा

भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावात असलेल्या या प्राचिन मंदिरात श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी पालखी सोहळा आयोजित केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. असे असले तरीही श्रावणात या मदिंराची फुलांनी आरास करून विधीवत पूजा केली जाते. आज दुसऱ्या श्रावणी सोमवारी फुलांची आरास करत घंटानादासह महादेवाची आरती करण्यात आली. यावेळी शिव मुकूट, शिवपिंड, नंदी, कासव यांच्यावरील फुलांच्या पांघरूणामुळे मंदिरातील दृष्य नयनसुख देणारे झाले आहे.

First Published on: August 3, 2020 3:41 PM
Exit mobile version