कोरोनाच्या संकटात मालेगावात पोलिसांचे विशेष काम

कोरोना संकटामुळे नाशिकच्या मालेगावात नेहमीसारखे सण साजरे झाले नाहीत. मुस्लिम बांधवांनी ईद घरातच साजरी केली. दरवर्षी ईदच्या सणाला लाखोंच्या संख्येने मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी येणारे मुस्लिम बांधव यंदा लॉकडाऊनमुळे घरातूनच नमाज अदा करत होते. पोलिसांनी सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या मालेगावमध्ये विशेष मेहनत घेतली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक ग्रामीणच्या आयपीएस अधिकारी आरती सिंग यांनी आपल्या टीमसोबत विशेष काम या परिसरात केले. तसेच यापुढेही नागरिकांचे असेच सहकार्य मिळो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

First Published on: June 5, 2020 8:43 AM
Exit mobile version