१८ प्रभागांमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला अधिक कोरोना रुग्ण हे इमारतींमध्ये आढळून आले होते. इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता. परंतु, काही दिवसांनी झोपडपट्टीत राहणारे नागरिक ही कोरोनाच्या कचाट्यात सापडले. त्यानंतर पाहता-पाहता १११ हून अधिक झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्रात बदल्या. मात्र, नंतर पालिकेने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आणि लॉकडाऊन लागल्यानंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. त्यामुळे मुंबई शहरातील २४ प्रभागांपैकी १८ प्रभागांमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

First Published on: June 22, 2021 3:52 PM
Exit mobile version