नाशिक महामार्गवर टाकले स्पिड ब्रेकर

दिंडोरी नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे नुतनीकरणाचे काम जोरात सुरु असताना दिंडोरीपासून नाशिककडे जाताना अवघ्या पाचसहा किलो मीटर अंतरावर रणतळ्यापासून ते अक्राळे फाटकापर्यंत जरा जरी पावसाची रिपरिप झाली तरी त्या ठिकाणी आपोआप गाड्या स्लिप होऊन अपघात होत होते. दरम्यान, गेल्या आठ ते दहा दिवसात त्याठिकाणी १५ ते २० अपघात झाले होते. त्यानंतर सर्वच सोशल मीडियावर आणि प्रिंट मीडियावर आरोपाच्या सरबत्ती सुरु झाल्यानंतर अखेर विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी पेठचे आमदार नरहरी झिरवाळ आणि दिंडोरी लोकसभेच्या खासदार यांनी त्वरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरीत अपघात स्थळाच्या जागेवर उपाय योजना करण्याच्या सूचना केल्यानंतर ठिकठिकाणी स्पिड ब्रेकर टाकून अपघात होणाऱ्या मालिकेच्या जागेवर पांढरे पट्टे टाकून त्याठिकाणी उपाय योजना केल्यानंतर त्या रस्त्यावरील अपघात कमी झाल्याचे आता समोर आले आहे.

First Published on: June 21, 2021 4:26 PM
Exit mobile version