बहुसंख्य एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ४५ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीदेखील राज्यातील काही भागांत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे सुरूच आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर अजय गुजर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत महत्त्वाची घोषणा केली. विलीनीकरणाची मागणी न्यायालयात सुरूच राहील. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी संप मागे घेत असल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगणार असल्याचं अजय गुजर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचं चित्र दिसत आहे.

First Published on: December 21, 2021 8:50 PM
Exit mobile version