लसीकरण, रेमडेसिवीर साठी ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार

“राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी नेमणार असून मुख्य सचिव या कमिटीचे अध्यक्ष असतील. या कमिटीत वरिष्ठ अधिकारी असतील”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. “तसेच ग्लोबल टेंडर काढायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. ही कंपनी ठरवेल की कोणती लस खरेदी करायची. रेमडेसिवीर आणि लस याबाबत ही कमिटी काम पाहिल”, असं अजित पवारांनी सांगितले आहे.

First Published on: April 24, 2021 7:48 PM
Exit mobile version