छगन भुजबळ यांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार

पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत अडकलेल्या वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी आणि इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबवरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेट भुजबळ नॉलेज सिटीमधील सहा बसेसच्या माध्यमातून पालकमंत्री कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुखरूप पाठवण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले.

First Published on: May 5, 2020 7:57 PM
Exit mobile version