कोण होणार महिला मुख्यमंत्री?; सुषमा अंधारे काय म्हणाल्या ?

महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात माध्यमांमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता शिवसेनेतील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी शिवसेनेत नुकतंच दाखल झालीये. जर यूपीमध्ये महिलेला पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळत असेल तर महाराष्ट्रात महिलेला अशी संधी मिळायला हरकत नाही. मी ज्या ठिकाणी आहे तीथे सुखात असल्याचं’ वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.

First Published on: December 2, 2022 5:42 PM
Exit mobile version