‘येतोय तो खातोय’ च्या निमित्ताने स्वप्निल राजशेखर सात वर्षांनी रंगभूमीवर

लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषिकेश जोशी यांचे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे. त्या नाटकाचे नाव आहे ‘येतोय तो खातोय’. लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये असलेले हे विनोदी नाटक राजकीय पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर यांनी लिहिलेले असून ऋषिकेश जोशी यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. या नाटकातील एका भूमिकेत अभिनेता स्वप्निल राजशेखर आपल्याला दिसणार आहे. तब्बल सात वर्षांनी रंगभूमीवर परतलेला स्वप्निल राजशेखर या नाटकासाठी एक्साईटेड आहे, त्याबद्दलच स्वप्निल आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे.

First Published on: February 10, 2023 8:00 AM
Exit mobile version