मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ न दिल्यास उद्रेक होईल, सफाई कामगारांचा इशारा

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगाराचा वारसा हक्क हा फक्त एका विशिष्ट जातीला नसावा. वारसा हक्क सर्व जातींसाठी होता. हा वारसाहक्क पूर्ववत करावा, अशी मागणी सफाई कामगार यांच्याकडून करण्यात येत आहे. आझाद मैदान येथे गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे फाइल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर जात नाही, असा आरोप सफाई कामगारांनी केला आहे.

First Published on: November 2, 2022 4:03 PM
Exit mobile version