तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करणार

देशभरात सध्या तान्हाजी चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. काही राज्यांनी तान्हाजी टॅक्स फ्री केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकार देखील तान्हाजी टॅक्स फ्री करण्याचा विचार करत आहे, लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्यातील कायदा व सुव्यवसथा राखण्याचे आमच्यासमोर आव्हान असून ते आम्ही पेलू असेही ते म्हणाले. तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांच्या व्हिडिओची माहिती मागितली आहे. चौकशी करुन त्यावर कारवाई करु, असेही देशमुख यांनी सांगितले.

First Published on: January 15, 2020 3:16 PM
Exit mobile version