तापसीचा ऑफिशिअल अॅप लाँच

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केलाय. या खास दिवशी तिने आपल्या ऑफिशिअल अॅपची भेट तिच्या चाहत्यांना दिली आहे. आजवर विविध भूमिकांमध्ये दिसणाऱ्या तापसीच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक झाले आहे. यामुळे तिची फॅन फॉलोईंगदेखील जबरदस्त वाढली आहे. आपल्या फॅनसोबत डायरेक्ट कनेक्ट राहण्यासाठी तिने हे अॅप लाँच केले असल्याचे ती सांगते.

First Published on: August 2, 2018 3:33 PM
Exit mobile version