पंढरपुरात ३ ठिकाणी होणार आरोग्य शिबिर – तानाजी सावंत

यंदाच्या आषाढी यात्रेत पंढरपुरात राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या संकल्पनेवर आधारित २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात सुमारे २० लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहे.

First Published on: June 7, 2023 8:04 PM
Exit mobile version