Viral: सचिन तेंडुलकरचे चॅलेंज नऊ वर्षीय वारिसने केले पूर्ण

लॉकडाऊनमुळे पंजाबमधील भटिंडा येथे राहणाऱ्या ढिल्लो कुटुंबियांतील नऊ वर्षीय वारिसजोस सिंग हा सध्या ठाण्यातील एअर फोर्स स्टेशन येथे वास्तव्यास आहे. क्रिकेटची आवड असलेल्या वारिसने चक्क डोळ्याला पट्टी बांधून बॅटने चेंडू उडवण्याचे चॅलेंज पूर्ण करून दाखवले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना चॅलेंज देत आहे. मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर यानेही व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले चॅलेंज वारिसने पूर्ण करून दाखवले आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

First Published on: June 9, 2020 10:49 AM
Exit mobile version