साडेतीन शक्तीपीठांपैकी दुसरे पूर्णपीठ तुळजापूची आई तुळजाभवानी

भारतातील शक्ती देवतांच्या १०८ शक्तीपीठापैंकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. महाराष्ट्रातील साडेतीन पीठापैकी तुळजापूरची भवानी आई हे पूर्णपीठ आहे. तुळजापूर देवस्थान उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. बालाघाट पर्वतरांगेत वसलेले हे तिर्थक्षेत्र अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. तुळजापूरचे मंदिर हे बालाघाट डोंगररांगात आहे. भवानी आईचे मंदिर तुळजापूर शहरापासून पश्चिमेला दरीत आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ देवीच्या इतर तीन मंदिरात जाताना आपल्याला पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र भवानी आईच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतराव्या लागतात. तुळजाभवानी आईचे मंदिर प्राचीन असून सोळाशे वर्ष जुने असून त्यांची बांधणी हेमाडपंथीय असल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानी आईच्या मंदिरात जाण्यासाठी शहाजीराजे महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वार अशा दोन महाद्वारातून प्रवेश करावा लागतो. चला तर मग चाऊ या आईचे दर्शन घ्यायला. तुळजापूरची भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा या नावाने देखील ओळखली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भासले घराण्याची आणि समर्थ रामदास यांची ही कुलदेवता आहे. यामागे अशी देखील अख्यायिका आहे की, त्या काळात तुळजाभवानी आईने छत्रपतींना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता.

First Published on: October 13, 2018 11:55 AM
Exit mobile version