६५० किलो चंदन ताब्यात, दोघांना अटक

राहुरी हद्दीतील ६१ लाख रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेश मधील बुर्‍हाणपूर येथे विक्रीसाठी नेत असताना राहुरी कारखान्यावर सापळा लावून अब्दुल मोहम्मद निसाद (३२) आणि अब्दुल फक्रुद्दीन रहमान (४१) या दोन आरोपीस ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून चंदन विक्री करणारी आंतरराज्य टोळी यामागे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी हद्दीतून बुर्‍हाणपूर मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार आहे. मिळालेल्या माहितीवरून राहुरी कारखाना येथे सापळा लावून छापा टाकला असता अंदाजे ६१ लाख रुपये किमतीचे चंदन (६५० किलो चंदन प्रति किलो ९ हजार ५०० प्रमाणे) आणि १० लाखांचे वाहन, असा एकूण ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

First Published on: June 15, 2021 5:57 PM
Exit mobile version