सायन हॉस्पिटलमध्ये दाटीवाटीत रुग्णांची सोय

सायन हॉस्पिटलमधील उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना रुग्णांचा मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला असून आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सायन हॉस्पिटलमधील ईएमएस (कॅज्युअल्टी) वॉर्डमध्ये एकाच बेडवर दोन दोन रुग्णांचा झोपवले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. हा शुक्रवारचा व्हिडिओ असल्याचे समजते. त्यामुळे रुग्णांमधील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हॉस्पिटल प्रशासनच हरताळ भासत असल्याचे दिसून येत आहे. अशाने कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनच वाढून हा आजार आणखीनच बळावण्याची शक्यता आहे.

First Published on: May 9, 2020 2:14 PM
Exit mobile version