टिटवाळ्यातील दोन महिलांची कोरोनावर मात

कस्तुरबा हॉस्पिटलमधून कोरोनाच्या आजारातून बरे होऊन सफाई कामगार आणि आयाचे काम करणाऱ्या दोन महिलांना घरी पाठवण्यात आले. यावेळी टिटवाळा येथे त्यांच्या राहत्या सोसायटीमध्ये त्यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. शिवाय त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या बचावासाठी नियमांचे पालन करण्याच्या सुचनाही दिल्या.

First Published on: April 20, 2020 7:28 PM
Exit mobile version