धगधगती मशाल घेऊन शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. मशाल चिन्ह मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अंधेरी येथील शिवसैनिका धगधगती मशाल घेऊन शिवाजी पार्कला आले होते. यानंतर ते मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचे आभार मानले. ही मशाल अन्याय, गद्दारी जाळणारी आहे. या मशालीचे महत्त्व आणि तेज त्याचा धोका लक्षात घ्या असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

First Published on: October 11, 2022 3:19 PM
Exit mobile version