CM उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार, विरोधकांना देणार प्रत्युत्तर

शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये ८ जून २०२२ रोजी सभा घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेतली होती. त्याच मैदानावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. शिवसेना आमदार आंबादास दानवे यांनी सभेसाठी परवानगी मागितली आहे. या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

First Published on: May 5, 2022 5:37 PM
Exit mobile version