आठ दिवसातून एकच दिवस लसीकरण मोहीम सुरू|

लसीच्या तुटवड्याचा परिणाम कल्याण डोंबिवली मधील लसीकरण मोहीमेवरही होऊ लागला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आजमितीला दोन लाख आठ हजार नागरिकांचे लसीकरण महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लसीच्या तुटवड्या परिणाम लसीकरण मोहीमेवर जाणवू लागला आहे. गेल्या महिनाभरात अनेकदा लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. गेल्या आठवडाभरात तर फक्त गुरुवारी लसीकरण मोहीम सुरू होती. त्यामुळे सात दिवसांपैकी सहा दिवस लसीकरण बंद होते. गुरुवारी ४ हजार लसींचा साठा महापालिकेला प्राप्त झाल्याने गुरुवारी हे लसीकरण मोहीम पालिकेच्या १७ केंद्रांवर सुरू होती. मात्र, पुन्हा एकदा लसींचा साठा संपल्याने तसेच सरकारकडून लसींचा पुरवठा न झाल्याने महापालिकेच्या लसीकरणाला ब्रेक लागला. अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर सकाळपासून येऊन उभे होते. मात्र, लसीकरण बंद असल्याने नागरिकांना पुन्हा माघारी परतावे लागले. त्यामुळे नागरिकांनी देखील आता लसींचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.

First Published on: May 22, 2021 6:34 PM
Exit mobile version