लॉकडाऊनमध्ये वल्लरी जोपासतेय चित्रकलेचा छंद

सध्या लॉकडाऊनमध्ये शाळकरी मुलांची मोठी पंचाईत झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मुलं घरामध्ये अक्षरशः कैद आहेत. त्यांना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त करताना पालकांच्या अगदी नाकीनऊ आले आहेत. मात्र यातही ते ऑनलाईन अभ्यास, घरगुती खेळ यातून वेळ काढून आपला छंद जोपासत आहेत. परळला राहणारी वल्लरी कमलेश नाईक या ४ थीत शिकणाऱ्या चिमुरडीने आपली चित्रकलेची आवड या वेळेत जोपासत आहे. अवघ्या ९ वर्षाच्या मुलीचे हे चित्र पाहून तुम्हालाही तिच्यातील भावी चित्रकार नक्की दिसेल.

First Published on: May 21, 2020 9:00 AM
Exit mobile version