चंद्रशेखर बावनकुळे यांची महाविकास आघाडीवर टीका

वेदांत सोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार झालेला नाही. आदित्य ठाकरे खोटे आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनाला आम्ही जशास तसे उत्तर देऊ. राज्याची जनता यांना माफ करणार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करत आहे. महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर वेदांत आणि फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचे खापर फोडले आहे.

First Published on: September 26, 2022 5:52 PM
Exit mobile version