Viral: स्वप्ना – शुभ्रा या बहिणींनी रचल्या खास ओवी

कोरोना विरोधात लढा देण्यासाठी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांचे आभार मानणारे अनेक पोस्ट, व्हिडिओ, गाणी आतापर्यंत सोशल मीडियावर आली आहेत. मात्र औरंगाबादच्या स्वप्ना आणि शुभ्रा मुळ्ये या बहिणींनी लॉकडाऊनमध्ये जात्यावर दळण दळतानाची ओवी रचून त्यात कोरोना फायटर्सला मानवंदना दिली आहे. २० मार्च रोजी बनवण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये औरंगाबाद, नागपूर ते थेट दुबईहून महिलांनी सहभाग घेतला आहे. तसेच ओवीच्या माध्यमातून कोरोनाबाबतची जनजागृतीही यांनी केली आहे.

First Published on: May 29, 2020 7:09 PM
Exit mobile version