आधी बैठका, मेळावे आणि मग मोर्चे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे खासदार संभाजी राजे यांनी राज्यव्यापी दौरे सुरू केले असताना दुसरीकडे शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याची मोहीम आखली आहे. मेटे यांनी जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन आधी बैठका घेणार. त्यानंतर मेळावे घेणार आणि मग मोर्चे काढणार. परंतु, आता काढण्यात येणारे मोर्चे मूक मोर्चे नसणार तर बोलके आणि संघर्ष करणारे असणार आहेत’, असा इशारा शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.

First Published on: June 12, 2021 7:35 PM
Exit mobile version