स्वस्त प्रवाशाचे आमिष; भाजप कार्यकर्त्यांकडून फसवणूक

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप असते. काही राजकीय पक्ष कोकणवासीयांची सोय व्हावी, यासाठी स्वस्तात बस प्रवास देत असतात. मात्र नालासोपारा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वस्त प्रवाशाचे आमिष दाखवत कोकणवासियांची फसवणूक केली आहे. कोकण व्हिजन या उपक्रमातंर्गत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन बुकिंग घेतली. मात्र बस सोडण्याच्या वेळेस प्रवाशांना ताटकळत उभे ठेवले. या फसवणुकीच्या विरोधात प्रवाशांनी आता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

First Published on: September 1, 2019 7:47 PM
Exit mobile version